गाझा पट्टीत इस्राइलनं हमासबरोबर युद्धबंदीच्या पुढच्या टप्प्यासाठी काही अटी घातल्या आहेत. जानेवारीत लागू झालेल्या युद्धबंदी कराराच्या पुढच्या टप्प्यासाठी इस्रायल गाझा पट्टीचं निःशस्त्रीकरण, हमास राजवटीचा अंत आणि ओलीस ठेवलेल्या नागरिकांना परत करण्याची मागणी केल्याचं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी सांगितलं. दुसऱ्या टप्प्यासाठी अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. परंतु हमासनं या मागण्या मान्य केल्या तर उद्यापासून हा करार लागू केला जाईल, अशी माहितीही सार यांनी दिली.
Site Admin | March 4, 2025 8:37 PM | Israel
इस्राइलच्या हमासबरोबर युद्धबंदीच्या पुढच्या टप्प्यासाठी काही अटी
