गाझा पट्ट्यातल्या ओलीस ठेवलेल्या इस्राइली नागरिकांची येत्या शनिवारपर्यंत सुटका केली नाही तर हमास बरोबरची युद्धबंदी संपवण्यात येईल असं सांगून त्यानंतर इस्राइल हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवेल असा इशारा इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे. या निर्णयाला इस्राइलच्या मंत्रीमंडळानंही मान्यता दिल्याचं नेतान्याहू यांनी काल एका ध्वनीचित्रफितीद्वारे सांगितलं. येत्या शनिवारी ओलिसांची सुटका करण्याचं पुढं ढकलल्याची घोषणा हमासनं केल्यानंतर नेतान्याहू यांनी हा संदेश दिला आहे.
Site Admin | February 12, 2025 8:38 PM | Hamas | Israel
हमास बरोबरची युद्धबंदी संपवणार, इस्राइलच्या प्रधानमंत्र्यांचा इशारा
