गाझात हमासच्या कैदेतून सुटलेले पहिले ३ बंधक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी कराराच्या पहिल्या दिवशी काल इस्रायलच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल.
इस्रायलनं हमाससोबत झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी या सुटकेचं श्रेय बायडन प्रशासन आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ट्रान्झिशन टीमला दिलं आहे. हमासनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास प्रत्युत्तर देण्याची तयारी असल्याचा इशारा इस्रायली लष्करानं दिला आहे.