गाझा पट्टीतली युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठीच्या करारावर मतदानासाठी विलंब केल्याचा आरोप इस्राइलने हमासवर केला आहे. मात्र, हमासने हा आरोप फेटाळून लावला असून युद्धबंदीसाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे. येत्या रविवारपासून या कराराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या करारानुसार, इस्रायली सैन्य गाझा पट्टीतून हळूहळू माघार घेईल आणि या युद्धबंदीला सुरुवात होईल. तसंच इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमासने ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली जाईल, असं या करारात नमूद करण्यात आलं आहे.
Site Admin | January 16, 2025 8:57 PM | Hamas | Israel