इस्त्राईलने हमास विरुद्धच्या युद्धात अधिक सैन्य अभियानाचा विस्तार करून गाझा पट्टीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला असून त्यात किमान 400 पॅलेस्टाईन नागरिक मारले गेल्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर 2023 पासून इस्त्राईल हमास युद्ध सुरू झाल्यापासून हा सर्वात मोठा हल्ला आहे.
इस्त्राईलचे पंतप्रधान बेंज्यामीन नेत्यानाहू यांनी काल इस्राईलच्या दूरचित्रवाणी मध्यमावरून बोलताना सांगितल की, आता युद्ध सुरू असतानाच पुढील चर्चा सुरू राहील. इस्राईलच्या उरलेल्या बंधकांची सुटका करण्यासाठी युद्धाचा दबाव आणणे जरुरीचे आहे. दरम्यान, गाजावर पुन्हा हल्ले सुरू करण्याच्यापूर्वी अमेरिकेशी आणि ट्रॅम्प प्रशासनाशी चर्चा करण्यात आल्याच व्हाईट हाऊसतर्फे स्पष्ट करण्यात आल आहे.