इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले असून १८ मार्चपासून ते आजपर्यंत ४३०हून अधिक ठिकाणांवर हल्ले झाल्याचं हमासच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. या हल्ल्यांमुळे दोन महिन्यांच्या युद्धबंदी कराराचं उल्लंघन झाल्याचंही हमासने म्हटलं आहे.
या हल्ल्यांमध्ये सुमारे ८३० जणांचा मृत्यू झाल्याचं गाझाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असून या काळात कोणत्याही इस्रायली नागरिकाच्या मृत्युची नोंद नसल्याचंही म्हटलं आहे.
इस्रायलनेही गाझापट्ट्यातून येणारी १४ क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती दिली असून त्यात येमेनमधून सहा, लेबनॉनमधून तीन आणि गाझा पट्ट्यातून आलेल्या पाच क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, असं इस्रायलच्या अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे.