इस्त्रायलनं गेल्या 24 तासांत गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात किमान 32 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आणि 54 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दोहा इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान शस्त्रसंधीसाठी प्रयत्न होत आहेत. कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं दोन्ही देशांमध्ये अप्रत्यक्ष चर्चा गेल्या आठवड्यात दोहा इथं झाली. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून गाझा युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत मृतांची संख्या 45 हजारच्या पुढे गेली आहे, अशी माहिती गाझामधील हमासच्या नेतृत्वाखालील आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, इस्रायलच्या तेल अवीव-जाफा भागात हौथी क्षेपणास्त्र हल्ल्यात १४ जण जखमी झाल्यानंतर अमेरिकी लष्करानं येमेनची राजधानी सनावर हवाई हल्ले केले.
Site Admin | December 23, 2024 10:01 AM | Israel Attack
इस्त्रायलनं गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात ३२ नागरिक ठार, ५४ जखमी
