इस्रायलनं हमासबरोबरची गाझामधली युद्धबंदी लांबणीवर टाकली आहे. मुक्तता करायचं ठरवलेल्या पहिल्या ओलीसांची यादी जोवर हमासकडून प्राप्त होत नाही तोवर युद्धविराम अंमलात येणार नाही, असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं.
भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता लागू होणार असलेला युद्धविराम सुरू न करण्याचे निर्देश नेत्यान्याहू यांनी संरक्षण दलांना दिले असल्याचं इस्रायलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हमासनं मात्र हा विलंब तांत्रिक कारणांमुळे झाल्याचं म्हटलं आहे. युद्धविराम करारानुसार, नियोजित प्रत्यर्पणाच्या २४ तास आधी नावं देणं आवश्यक आहे.
गाझामधली लढाई थांबवण्याचा करार हा फक्त तात्पुरता युद्धविराम असून, कराराच्या अटी मोडल्यास युद्ध पुन्हा सुरू करण्याचा हक्क इस्रायल राखून ठेवत असल्याचा इशारा, नेत्यान्याहू यांनी काल रात्री दिला होता.