इस्त्रायलनं लेबनॉनसह इतर भागात ६० दिवस युध्दविरामाची घोषणा केली आहे. अमेरिकेनं मध्यस्थी केल्यानंतर ही योजना आखण्यात आल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं. युध्दविरामा संदर्भात इस्त्रायलच्या मंत्रीमंडळात प्रस्ताव सादर केला गेला आहे. इस्त्रायली सैन्य आणि हिजबुल्ला दरम्यान ६० दिवसांचा हा युध्दविराम असेल. लेबनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या कराराला आधीच पाठिंबा दर्शवला आहे. मात्र हिजबुल्लाहनं कराराचं उल्लंघन केल्यास त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही नेतन्याहू यांनी दिला आहे. संयुक्त राष्ट्रानं या कराराचं स्वागत केलं आहे.
Site Admin | November 27, 2024 1:42 PM | Israel | Lebanon