इस्रायल आणि हमास यांनी युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. कतारचे प्रधानमंत्री मोहंमद बिन अब्दुल रेहमान अल-थानी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर या कराराचं स्वरूप निश्चित करण्यात आलं. या कराराची अंमलबजावणी रविवारपासून होणार असून ही युद्धबंदी ४२ दिवसांची असेल. अल थानी यांनी काल दोहामध्ये या कराराबाबत माहिती दिली.
या करारामुळे इस्रायलच्या ओलिसांची मुक्तता केली जाईल आणि गाझामध्ये मानवतावादी मदतीला चालना मिळेल. इस्रायलमधल्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक होऊन या कराराला मान्यता दिली जाईल. हमासनं दोहामध्ये मध्यस्थांबरोबरच्या चर्चेत कराराच्या मसुद्याला मान्यता दिल्याचं हमास संघटनेकडून सांगण्यात आलं.
युरोपियन महासंघाने गाझामधल्या या कराराचं स्वागत केलं असून दोन्हीकडून याची अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. भारतानेही या कराराचं स्वागत केलं आहे. या करारामुळे गाझा पट्टीतल्या लोकांना मदतीची हमी आणि सुरक्षितता मिळेल, भारताने या युद्धातल्या ओलिसांच्या सुटकेचा आणि युद्धबंदीचा कायम आग्रह धरल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
Site Admin | January 16, 2025 1:41 PM | इस्राईल | युद्धबंदी | हमास