इस्राईलच्या हवाई दलानं काल रात्री गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांची संख्या ४०० झाली आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते या हल्ल्यात ५०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इस्राईल आणि हमास यांच्यातल्या संघर्ष विरामासंदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा हल्ला झाला. १९ जानेवारी दोघांनी संघर्ष विराम करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.