गाझामध्ये बंदीवासात मृत्यू झालेल्या चार ओलिसांना आज इस्त्रायलकडे सुपूर्द केलं जाणार आहे. या नागरिकांची यादी इस्त्रायलला मिळाली असल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयानं निवेदनाद्वारे काल जाहीर केलं.
संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना याबाबत इस्त्रायलच्या संरक्षण दलाकडून कल्पना देण्यात आली असल्याचं एका समाजमाध्यमावरील संदेशात नमूद करण्यात आलं आहे. या ओलिसांचा मृत्यू हा देशासाठी अत्यंत कठिण काळ असल्याचं सांगत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.