इस्रायलने राफेल प्रगत संरक्षण प्रणाली आणि एल्बिट सिस्टीम नावाच्या दोन इस्रायली संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांसोबत ५३ कोटी ७० लाख डॉलर्सचा करार केला आहे. इस्रायलची लेझर संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करणं हा या करारामागचा उद्देश आहे. या करारांतर्गत आयर्न बीम लेझर इंटरसेप्शन नावाच्या प्रणालीचं उत्पादन वाढवण्यात येणार आहे, जे पुढच्या वर्षभरात इस्रायलच्या हवाई संरक्षण सेवेत आणलं जाईल, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
Site Admin | October 29, 2024 1:43 PM | Israel