दिल्लीत झालेल्या भारतीय फुटबॉल साखळी सामन्यात केरळ ब्लास्टर्सनं पंजाब एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. सामन्यावर पंजाबच्या संघाचं वर्चस्व राखले होते तरीही त्यांना त्याचं गोलमध्ये रुपांत करता आलं नाही. या विजयामुळे केरळ ब्लास्टर्स नवव्या स्थानी पोचला असून, पंजाब एफसी हा चौथा पराभव आहे. पंजाब 18 व्या स्थानावर आहे. आज संध्याकाळी कोलकाता इथं ईस्ट बंगाल एफसीचा मुकाबला मुंबई सिटी एफसीशी होणार आहे. साखळीत मुंबई सातव्या तर ईस्ट बंगाल 11 व्या स्थानी आहे. 12 मार्चला साखळी फेरीची सांगता होणार आहे.
Site Admin | January 6, 2025 10:33 AM | Football | ISL 2024-25
फुटबॉल : केरळ ब्लास्टर्सचा पंजाब एफसी संघावर १-० असा विजय
