स्वयंपाकघराची सुरक्षितता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी भारतीय मानक संघटना BIS चं पालन करणं अनिवार्य केलं आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT ने जारी केलेल्या आदेशानुसार, अशा भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य आहे.
या आदेशाचं पालन न केल्यास शिक्षा होऊ शकते, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. BIS ने स्वयंपाकघरातील अत्यावश्यक वस्तूंचा समावेश करणारी मानकांची श्रेणी नुकतीच तयार केली आहे.