हिजबुल्लाह आणि हमास या अतिरेकी संघटनांच्या काही प्रमुख नेत्यांना मारल्याचा बदला म्हणून इराणनं इस्त्राईलवर काल क्षेपणास्त्र हल्ला केला. काल रात्री उशिरा पर्यन्त इराणनं इस्राइल वर 180 क्षेपणास्त्र डागली. इस्राइलच्या तेल अविव आणि जेरूसेलेम या दोन प्रमुख शहरांवर हा क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानं नागरिकांनी बॉम्ब रोधक ठिकाणांचा आश्रय घेतला. या हल्ल्यामुळे काल दिवसभर इस्त्राईल मध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी सतत भोंगे वाजत होते. दरम्यान, कालच्या हल्ल्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही अस इस्राइल लष्कराचे प्रवक्ते डैनियल हगारी यांनी सांगितलं. मात्र या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून इस्राईल मध्यपूर्व भागात जोरदार हवाई हल्ला करेल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. इराणने केलेला क्षेपणास्त्र हल्ला इस्त्राईलने अमेरिका आणि इतर राष्ट्रांच्या मदतीने परतवून लावला असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मैथ्यू मिलर यांनी दिली आहे.
Site Admin | October 2, 2024 11:53 AM | Hamas | Israel