अंतराळ तंत्रज्ञान दिनानिमित्त, इराणच्या राजधानीत काल तीन स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचे अनावरण इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि इतर संबंधितांच्या उपस्थितीत कऱण्यात आलं. नवाक 1, पार्स 2 आणि पार्स 1 चे अद्ययावत मॉडेल अशी त्यांची नावं आहेत. इराण अंतराळ संशोधन केंद्रानं विकसित केलेला नवाक संप्रेषण उपग्रह स्वदेशी सिमोर्ग प्रक्षेपका वाहनाच्या सुधारित आवृत्तीची चाचणी घेण्यासाठी निर्माण कऱण्यात आला असून त्यात डोसिमेट्री पेलोड, मॅग्नेटोमीटर सेन्सर बसवण्यात आले आहेत.
Site Admin | February 3, 2025 10:55 AM | इराण | उपग्रह
इराणने तीन स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचे केले अनावरण
