इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरीकेशी थेट वाटाघाटीला इराणने नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी इराणला पाठवलेल्या पत्राला ओमान सल्तनतच्या माध्यमातून उत्तर देताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कन यांनी या वाटाघाटीत मध्यस्थ असण्याला मात्र संमती दर्शवली आहे. इराणने अण्विक अस्त्र मिळवणे इस्रायल आणि अमेरिकेला मान्य असणार नाही असं ट्रंप यांनी एका मुलाखतीत नमूद केलं होत. इराणच्या तेहरान आण्विक करारातून अमेरिकेने २०१८ मध्ये एकतर्फी अंग काढून घेतले होते. त्यानंतर या वाटाघाटी थांबल्या होत्या.
Site Admin | March 30, 2025 8:45 PM | Iran | US
इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरीकेशी थेट वाटाघाटीला इराणचा नकार
