इराणमधल्या तेहरान इथं सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत झालेल्या गोळीबारात २ न्यायाधीशांचा जागीच मृत्यू झाला तर १ न्यायाधीश जखमी झाले. हल्लेखोरानं या तिघांच्या दिशेनं गोळीबार केला होता. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या इसमानं देखील स्वतः वर गोळी झाडल्याचं वृत्त स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलं आहे. हल्लेखोराचा गोळीबाराचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
Site Admin | January 18, 2025 8:41 PM | Iran
इराणमधे झालेल्या गोळीबारात दोन न्यायाधीशांचा मृत्यू
