गाझाप्रश्नी इस्लामिक सहकार्य संघटनेनं तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अर्गाची यांनी केली आहे. इजिप्तचे परराष्ट्रमंत्री बद्र अब्देलत्ती यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरुनन याबाबत चर्चा केली आणि पॅलेस्टीनींच्या हक्काबद्दल या दोन्ही देशांचं एकमत असल्याची खात्री केली.
दरम्यान, गाझापट्टीतल्या घडामोडी आणि अमेरिकेच्या भूमिकेचा जागतिक स्तरावर निषेध यासंबधी 27 फेब्रुवारीला नियोजित अरब शिखर परिषदेचं नेतृत्व इजिप्त करणार असल्याचंही इजिप्तनं घोषित केलं आहे.