आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं काल रात्री झालेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं ५ गडी बाद १८८ धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं वीस षटकांमध्ये तेवढ्याच धावा केल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. स्टार्क स्टेलरच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सचे शिमरॉन हेटम्येर ११ धावाच करू शकले. दिल्ली कॅपिटल्सच्या के. एल. राहुल आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी हा आकडा सहजपणे पार करत विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा मायकेल स्टार्क याला सामनावीर घोषित करण्यात आलं. आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.