आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. विशाखापट्टणम इथल्या डॉ राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना आज सायंकाळी साडेसात वाजता सुरु होईल.
काल मुंबईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन संघाचा पराभव केला, तर हैद्राबाद इथं झालेल्या सामन्यात सन रायझर्स हैद्राबाद संघाने राजस्थान रॉयल्स चा पराभव केला होता.