आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
बेंगळुरु इथं काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचा आठ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सने २ गड्यांच्या मोबदल्यात १७ षटकं आणि ५ चेंडूत १७० धावा केल्या. गुजरात टायटन्ससाठी जोस बटलरनं ३९ चेंडूत ७३ धावा केल्या. तर मोहमद्द सिराजनं ३ गडी बाद केले. गुणतालिकेत पंजाब किंग्स पहिल्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु तिसऱ्या स्थानी आहे.