आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांची लढत होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने जिंकल्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.
स्पर्धेतला आजचा दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. सलग तीनही सामने गमावलेल्या चेन्नईसाठी हा सामना महत्वाचा आहे.