इंडियन प्रिमियर लीग क्रिकेटमध्ये आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबाद इथं हा सामना होईल. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. चेन्नई इथं सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.
कालपासून या स्पर्धेला सुरूवात झाली असून कालच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला.