आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकता नाईट राईडर या संघांमध्ये सामना होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
काल बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्सने दिलेलं १६४ धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं १७ षटकं आणि ५ चेंडूत ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.