आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्स सलग तीन सामने जिंकत सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु चौथ्या स्थानी आहे.
दरम्यान कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, २१८ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ १९ षटक २ चेंडूत १५९ धावांत गारद झाला. सामन्यादरम्यान षटकांची गती न राखल्याबद्दल राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.