देशातल्या गुंतवणूकदारांना लवकरच अडीचशे रुपयाची SIP करता येणार आहे. यामुळं अधिकाधिक लोकांपर्यंत या गुंतवणूक सुधारणांचे फायदे पोहोचतील अशी माहिती सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी दिली. म्युच्युअल फंड उद्योगासोबत या प्रस्तावावर काम सुरू आहे, असं त्या म्हणाल्या. IPO सोबत दिलं जाणारं माहितीपत्रक १५-१६ प्रादेशिक भाषांमध्ये असावं, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.
Site Admin | September 2, 2024 8:18 PM | SIP
गुंतवणूकदारांना लवकरच अडीचशे रुपयाची SIP करता येणार – सेबी
