केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी गांधीनगर मध्ये झालेल्या पुनर्गुंतवणूक बैठकीच्या चौथ्या टप्प्यात २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सुमारे ३२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची ग्वाही दिली आहे. जोशी पत्रकार परिषदेत बोलत होते. विविध राज्य सरकारे आणि खाजगी उत्पादकांसह सर्व भागधारकांनी सौर आणि पवन ऊर्जेसह अक्षय ऊर्जेच्या विविध क्षेत्रांमध्ये भरीव गुंतवणूक करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ऊर्जा क्षेत्रात मोठं परिवर्तन होत असून यामध्ये भारत अग्रेसर असल्याचं जोशी म्हणाले. नवीकरणीय ऊर्जेविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याची हीच वेळ आहे, असंही ते म्हणाले.
Site Admin | September 18, 2024 10:17 AM | Prahlad Joshi