छत्रपती संभाजीनगर शहरात चार मोठे उद्योजक ५२ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या उद्योजकांचा काल मसिआ या संघटनेच्या वतीनं सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातल्या उद्योजकांनी यावेळी राज्य सरकारला मानपत्र दिलं. हे मानपत्र म्हणजे विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर असल्याचं सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं. या उद्योगांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतलं जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
Site Admin | August 13, 2024 8:53 AM | Uday Samant
छत्रपती संभाजीनगर इथं होणारी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आर्थिक क्रांती घडवेल – उद्योगमंत्री उदय सामंत
