चालू आर्थिक वर्षात देशात खासगी उद्योगांची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढेल, असा भारतीय रिझर्व बँकेचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ही गुंतवणूक एक लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस कोटी होती, ती यंदा दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे बारा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशांतर्गत मागणीतही वाढ होत असून विशेषतः ग्रामीण भागात मागणी वाढत असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे.
Site Admin | August 21, 2024 1:08 PM | RBI
खासगी उद्योगांची गुंतवणूक ५४ टक्क्यांनी वाढेल – आरबीआयचा अंदाज
![खासगी उद्योगांची गुंतवणूक ५४ टक्क्यांनी वाढेल – आरबीआयचा अंदाज](https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/08/GVfUbp1WIAAsWmN.jpg)