पश्चिम बंगाल सरकारने आर जे कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक प्रनब कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय विशेष तपास पथक तयार केलं आहे. 2021 पासूनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार असून एका महिन्यात हे पथक आपला अहवाल सादर करेल. कोलकत्यातल्या सागोर दत्त वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच कॉलेज ऑफ मेडिसीनमधल्या परिचारिकांनी काल या प्रकरणी निषेध फेरीत सहभाग घेत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. रुग्णालयाच्या आवारात या परिचारिकांनी आपला निषेध व्यक्त केला असून या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या काही डॉक्टरांनीही यात सहभाग नोंदवला. दरम्यान, या अत्याचार आणि हत्या प्रकरणातली चुकीची माहिती आणि पीडितेचं नाव समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्याप्रकरणी कोलकत्ता पोलिसांनी शहरातल्या दोन प्रतिष्ठित डॉक्टरांना समन्स बजावलं आहे. या विरोधात वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजण रस्त्यावर उतरले आहे. हे दोन्ही डॉक्टर पोलिस चौकशीसाठी जात असताना शेकडो विद्यार्थी व डॉक्टर्स समर्थनार्थ त्यांच्यासोबत चालत होते.
Site Admin | August 20, 2024 10:29 AM | Kolkata
कोलकत्याच्या आर जे कार रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकारकडून विशेष तपास पथक स्थापन
