डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जगभरासह देशात आज महिला दिन साजरा

जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार, समान हक्क आणि सबलीकरण ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस महिलांचं योगदान आणि कर्तबगारीचा गौरव करण्याचा असून महिलांच्या विकासाच्या प्रवासात सर्व देशवासीयांनी त्यांना साथ द्यावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. 

 

विकसित भारतासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास महत्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक योजना आणि धोरणं आखली आहेत, देशभरातल्या महिलांना आपण नमन करत आहोत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा