‘नारी शक्ती सह विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा महिला दिन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज केली. या निमित्ताने नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे. महिलांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय तसंच वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून दाखवलेल्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी यंदा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरकार विविध धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि लिंगभाव समानतेसाठी काम करत असल्याचंही त्या म्हणाल्या.
Site Admin | March 6, 2025 1:19 PM | International Women's Day
‘नारी शक्ती सह विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा महिला दिन
