देश कमकुवत असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकत नाही, असा भारताला विश्वास आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. एअरो इंडिया २०२५ परिषदेत संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला ते आज संबोधित करत होते. जगभरातल्या वाढत्या संघर्षामुळे अनिश्चितेत भर पडत आहे. नवीन सत्तासंबंध, नवीन शस्त्रास्त्र, राज्यसंस्थेतर शक्तिंचा वाढता प्रभाव यामुळे जागतिक व्यवस्था अधिक नाजूक झाली आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. त्याचप्रमाणे सीमा सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था यातील फरक पुसट होत चालला आहे, सायबर अवकाश आणि बाह्य अवकाशाची परिमाणं सार्वभौमत्वाच्या रुढ व्याख्येला धक्का देत आहेत, असंही ते म्हणाले.
Site Admin | February 11, 2025 2:19 PM | एअरो इंडिया २०२५ परिषद | संरक्षण मंत्री
देश कमकुवत असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकत नाही – संरक्षण मंत्री
