पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकाचं आयोजन येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान मुंबईत प्रभादेवी इथे केलं जाणार आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालं. चार दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात विविध विषयांवरचे एकूण ४१ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसंच, या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातल्या विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
Site Admin | April 8, 2025 7:53 PM | international Marathi film festival | Minister Ashish Shelar
आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकाचं २१ ते २४ एप्रिलला आयोजन
