भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. हरयाणात कुरुक्षेत्र इथं गीता ज्ञान संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीतामहोत्सवाला ते संबोधित करत होते. गेल्या १० वर्षात भारताने अभूतपूर्व प्रगती केली असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्जुनाचा निर्धार अंगी बाणवला पाहिजे असं ते म्हणाले.
Site Admin | December 8, 2024 8:16 PM | #International GitaMahotsav | Vice President Jagdeep Dhankhar
भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
