आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक इस्रायली नेत्यांच्या अटकेसाठी काढलेल्या वॉरंटचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निषेध केला आहे. आयसीसीची ही कृती इस्रायलच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजिबात न्याय्य नाही. इस्रायलला असलेल्या धोक्यांविरोधात अमेरिका नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असं बायडन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनीही आयसीसीच्या निर्णयाचा निषेध केला असून आपल्यावर जाणीवपूर्वक खोटा आरोप केल्याचं म्हटलं आहे. आयसीसीने केलेले आरोप इस्रायल आणि हमास या दोघांनीही फेटाळून लावले असले तरी फ्रान्स आणि नॉर्वे या देशांनी मात्र आयसीसीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.
Site Admin | November 22, 2024 2:48 PM | International Criminal Court