दहशतवाद विरोधी आंतरराष्ट्रीय करार तत्काळ स्वीकार करावा यासाठी भारतानं आवाहन केलं आहे. भारतानं पहिल्यांदा तीस वर्षीपुर्वी हा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायदा समितीला संबोधित करताना भारताच्या कायदा अधिकारी आर. मैथिली यांनी दहशतवादी गटांच्या वाढत्या ताकदीविषयी चिंता व्यक्त केली. दहशतवादी गट, ड्रोन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर क्षमता वाढवण्यासाठी करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. आंतररराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक कराराला अंतिम रुप देण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्नशील राहाण्याच्या गरजेवर भर दिला.
Site Admin | October 5, 2024 1:05 PM | international-convention-against-terrorism