आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना आणि इंडीयन ऑईल यांच्याद्वारे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहत दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आल आहे. याद्वारे राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यासह महिला बंदिवानांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचं कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितलं.येरवडा कारागृहात बंदिवानांसाठी बुद्धिबळ खेळास सुरूवात केल्यानंतर एका वर्षातच आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं गुप्ता यांनी नमूद केलं. बाहेर सर्व सुविधा असणाऱ्या खेळाडूंना जे जमणार नाही ते या कारागृहातील कैदी खेळाडूंनी करून दाखविलं अशा शब्दांत गुप्ता यांनी बंदिवान खेळाडूंचं कौतुक केलं आहे.सध्या येरवडा कारागृहात महिला आणि पुरूष असे २०० कैदी बुद्धिबळ शिकत आहेत.
Site Admin | June 20, 2024 10:09 AM | आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना | चेस फॉर फ्रीडम