डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाचा सर्वसमावेशक धोरण

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने एक सर्वसमावेशक धोरण ठरवलं असून योग्य प्रक्रिया पूर्ण करून या अधिवेशनात याबाबतचा शासन निर्णय आणला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. २०१८ मध्ये आलेल्या दोन शासन निर्णयांद्वारे एकंदर ३३ खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर, अभिनंदन प्रस्ताव मंजूर करून तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पाठवण्याची सूचना आज विधान परिषदेत करण्यात आली. बीसीसीआयचे खजिनदार असलेले आमदार आशीष शेलार यांचा उल्लेख या प्रस्तावात करण्याची मागणी प्रसाद लाड यांनी केली. त्यावरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. मुंबई ते मोरा फेरी बोटीवरच्या कामगारांना, आर्थिक मदत किंवा कर सवलतीची कोणतीही मागणी आलेली नसल्याची माहिती संबंधित खात्याचे मंत्री संजय बनसोडे यांच्या वतीने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावर विरोधी पक्षांनी पुन्हा गदारोळ आणि घोषणाबाजी करून सभात्याग केला. या प्रश्नाबाबत सहानुभूतीने विचार करून बैठक घेऊ, असं आश्वासन पाटील यांनी दिलं. विविध परीक्षांमधल्या पेपरफुटीच्या निषेधात विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधीमंडळ आवारामधे निदर्शनं केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा