संरक्षण विभागानं आजपासून दिल्लीत तीन सेवांमधील अधिकाऱ्यांसाठी पहिला संयुक्त आढावा मूल्यांकन कार्यक्रम आयोजित केला आहे. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह तिन्ही दलांचे मेजर जनरल आणि समकक्ष अधिकाऱ्यांसाठी हा पाच दिवसीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात धोरणात्मक नियोजन, भविष्यातले धोके, आव्हानं आणि संघर्षांसाठी योग्य अंदाज आणि तयारी यांचा समावेश असेल. विविध विभांगांमधे समन्वय आणि एकात्मता वाढवणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे.
Site Admin | September 9, 2024 2:22 PM | defence | Evaluation
संरक्षण विभागातर्फे तीन सेवांमधील अधिकाऱ्यांसाठी पहिला संयुक्त आढावा मूल्यांकन कार्यक्रमाचं आयोजन
