परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या थकित पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यामुळं पैसे काढण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी २०२१ या वर्षातल्या थकीत पीक विम्याचे २२५ कोटी रुपये आठ दिवसांत जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर वीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती.