डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज, अहमदनगर जिल्यातलं लिंगदेव, नाशिक जिल्ह्यातलं कळवण-सुरगणा, जांबुटके आणि अमरावती जिल्ह्यातलं वरुड इथं एमआयडीसी उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसंच राज्यात यापुढे एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमीनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातल्या त्यांच्या समिती कक्षात आज एमआयडीसी आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. 

 

राज्याच्या विकासात उद्योगांचं स्थान अत्यंत महत्वाचं असून उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. तसंच पुणे जिल्ह्यातल्या डुंबरवाडी इथं फूड प्रोसेसिंग पार्क उभारणीसाठी शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीला मंत्री उदय सामंत, मंत्री धर्मराव आत्राम उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा