मुंबईत मद्यपान करून वाहन चालवण्याची प्रकरणं थांबवण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची ठिकाणी आणि नाक्यानाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणारे पब्ज आणि बारवरही कारवाया कराव्यात, अशी सूचना मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि सुट्टीच्या दिवशी तपासण्यांचं प्रमाण वाढवावं, मद्यपान करून वाहनं चालवणाऱ्या चालकांकडून दंड वसूल करण्यात यावा आणि वारंवार नियम मोडणाऱ्यांचा चालक परवाना रद्द करण्यात यावा, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
पब्ज, पार, उपहारगृहांच्या वेळा, ध्वनिप्रदूषणासंबंधीचे नियम, आवश्यक परवाने वेळोवेळी तपासावेत, नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करावी, त्यांचे परवाने रद्द करावेत आणि यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनानं समन्वयाने काम करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.