इ कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची वापरण्यायोग्य असण्याची मुदत ते ग्राहकांना मिळाल्यानंतर किमान ४५ दिवसांपर्यंत असेल याची खबरदारी घेण्यात यावी असं भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरणानं म्हटलं आहे. त्यानुसार या कंपन्यांनी आपली कार्यपद्धती ठरवावी असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. यामुळे ग्राहकांना चुकीची माहिती मिळणं थांबेल आणि त्यांच्या हिताचं संरक्षण होईल असं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमला वर्धन राव यांनी म्हटलं आहे. प्राधिकरणानं यासंदर्भात स्विगी आणि झोमॅटो यासारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची काल नवी दिल्लीत बैठक घेतली.
Site Admin | November 13, 2024 9:32 AM | इ कॉमर्स | भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण