लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठीचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मेटा या कंपनीने केली आहे. अनावश्यक मेसेजेस रोखणं, गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय, पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल. १६ वर्षं वयापेक्षा कमी असलेल्या युजर्सचा वावर अधिक सुरक्षित करण्याकडे मेटाचं प्राधान्य असेल. अशा युजर्सच्या अकाउंटवर पालकांना नियंत्रण ठेवता येईल, तसंच ॲपच्या वापराचा वेळही पालकांना निश्चित करता येणार आहे.
Site Admin | February 11, 2025 8:30 PM | Instagram | Meta
इन्स्टाग्रामवर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक पर्याय उपलब्ध
