भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची आयएनएस शिवालिक ही युद्धनौका २९ व्या द्विवार्षिक रिम ऑफ द पॅसिफिक या आंतरराष्ट्रीय सागरी सरावांमध्ये सहभागी होणार आहे. हा सराव हवाई बेटांवर होणार असून १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अमेरिकन नौदलानुसार २९ देश, ४० युद्धनौका, ३ पाणबुड्या, १५० हून अधिक विमान आणि २५ हजारांहून अधिक जवान यात सहभागी होणार आहेत. हा सराव अभ्यास कमांडर ऑफ यूएस पॅसिफिक फ्लिट यांनी आयोजित केला आहे.
Site Admin | June 29, 2024 8:10 PM | आयएनएस शिवालिक युद्धनौका
आयएनएस शिवालिक युद्धनौका आंतरराष्ट्रीय सागरी सरावांमध्ये सहभागी होणार
