आयएनएस शिवाजी या नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात ३५ अधिकाऱ्यांनी सागरी अभियांत्रिकी प्राविण्य अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. यामध्ये भारतीय नौदलातल्या २१, भारतीय तटरक्षक दलातल्या ४ आणि श्रीलंका, नामिबिया आणि फिलिपाइन्स या देशांमधल्या प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला होता. नौदलातल्या अधिकाऱ्यांना तांत्रिक कौशल्य आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्रातलं अद्ययावत ज्ञान देण्याच्या उद्देशानं हा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. याशिवाय अतिशय प्रतिकूल वातावरणात जहाजावर वास्तव्य करणं आणि कोणत्याही कारवाई दरम्यान सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज राहण्याचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जातं.
Site Admin | January 1, 2025 7:07 PM | INS Shivaji
INS शिवाजी नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात ३५ अधिकाऱ्यांचं सागरी अभियांत्रिकी प्राविण्य अभ्यासक्रम पूर्ण
