भारताचं सामर्थ्य आमची युवा शक्ती आहे. आणि युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही आमची खरी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीतील तेराशे विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. देशभरातल्या 51 केंद्रांवर या स्पर्धा सुरू आहेत. देशातले युवक विविध समस्यांवर उपाय शोधून तोडगा काढत सरकारला साथ देत असून यामुळं भारत विकसित होण्याच्या मार्गावर आहे याचा विश्वास वाटतो असं प्रधानमंत्री म्हणाले.
हॅकेथॉनच्या काल सुरू झालेल्या अंतिम फेरीत राज्यातल्या मुंबई, पालघर, बुलडाणा, नांदेड, कोल्हापूर, नाशिक धुळे, पुणे, नागपूर, वर्धा, सोलापूर, ठाणे, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. पुण्यातील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात हार्डवेअर गटाची अंतिम फेरी होत आहे.
Site Admin | December 12, 2024 8:55 AM | PM Narendra Modi | स्मार्ट इंडिया हॅकेथॉन